कुंभमेळ्याला गेलेल्या रत्नागिरीतील भाविकांच्या गाडीला अपघात; तिघे ठार
रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला घराकडे परतत असताना अपघात झाला. या भीषण अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास नाशिक येथे घडली. त्यात एकाची प्रपृती गंभीर तर आणखी तिघे किरकोळ जखमी झाले. या भीषण अपघातात मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे माजी सरचिटणीस आणि निवृत्त प्राचार्य प्रताप सावंत-देसाई, इनोव्हा कार चालक भाग्यवान झगडे व अक्षय निकम यांचे दुर्दैवी निधन झाले. हा अपघात नाशिक जिह्यातील सिन्नर येथे शनिवारी पहाटे 4 वाजता घडला. कुंभमेळा आटपून घरी रत्नागिरीकडे येत असताना नाशिकमधील मार्गावर सिन्नर येथे समोरून येणाऱया डंपरने इनोव्हा कारला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List