संन्यासी बनन्याचं ढोंग करतेय का? प्रश्न ऐकताच ममता कुलकर्णी मोठमोठ्याने मंत्र म्हणायला लागली

संन्यासी बनन्याचं ढोंग करतेय का? प्रश्न ऐकताच ममता कुलकर्णी मोठमोठ्याने मंत्र म्हणायला लागली

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या तिला मिळालेल्या ती किन्नर आखाड्याच्या ‘महामंडलेश्वर’ पदवीबाबत अनेक वाद निर्माण झाले. अनेकांनी याला विरोध केला. त्यानंतर ममता कुलकर्णी ही प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. यानंतर तिला टीव्ही शो ‘आपकी अदालत’मध्ये मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं होतं.त्यावेळेस अनेक गोष्टींचे खुलासे तिने केले आहेत.

‘महामंडलेश्वर’ ही पदवीनंतर वादाच्या भोवऱ्यात अडकली

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी दीर्घकाळ मीडियापासून दूर राहिली आणि नुकतीच भारतात परतली आणि पुन्हा एकदा चर्चेत आली. 2025 च्या महाकुंभात ‘महामंडलेश्वर’ ही पदवी मिळाली आहे. ‘आपकी अदालत’मध्ये ममताने बॉलिवूड सोडण्याच्या आणि निवृत्ती घेण्याच्या निर्णयाबद्दल मोकळेपणाने बोलली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajat Sharma (@rajatsharmalive)

जोरजोरात सप्त श्लोकी दुर्गा पाठ म्हणण्यास सुरुवात 

दरम्यान या मुलाखतीचे बरेचसे छोटे व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. या मुलाखतीत रजत शर्मा यांनी तिला महामंडलेश्वर होण्यासाठी वेदांचे ज्ञान असले पाहिजे का असं विचारलं. तसेच ममता कुलकर्णी संन्यासी बनन्याचं ढोंग करतेय का? असे काही प्रश्न विचारताच ममता कुलकर्णीने चक्क जोर जोरात मंत्र बोलण्यास सुरुवात केली.

ममताने सप्त श्लोकी दुर्गा पाठ म्हणण्यास सुरुवात केली, जे ऐकून लोकांनी तिचे कौतुक केले आणि टाळ्या वाजवल्या. मात्र, सोशल मीडियावर काही लोक तिच्या या श्लोकांमध्येही चुका शोधून काढत तिला ट्रोल करत आहेत. या मुलाखतीदरम्यान ममताकडून बॉलिवूडपासून ते तिच्या खासगी आयुष्यापर्यंतच्या बऱ्याच गोष्टींबद्दलचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

चित्रपटसृष्टी सोडण्याचे कारण

रजत शर्माने ममता यांनी ममताला बॉलिवूड सोडण्याचं कारण विचारलं. यावर ममताने सांगितले की बॉलीवूड हा एक भ्रम आहे आणि लोक फक्त शान-शौकतच्या मागे धावत आहेत हे तिला समजले आहे. हाच तो काळ होता जेव्हा त्याने आध्यात्मिक जीवनाचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला.

अंमली पदार्थांच्या तस्करीत नाव आल्याने वाद

ममता कुलकर्णीने 2000 च्या दशकाच्या सुरूवातीला फिल्म इंडस्ट्रीपासून स्वतःला दूर केले होते आणि त्यानंतर 2016 मध्ये तिचे नाव ड्रग स्मगलिंग प्रकरणातही आले होते. या प्रकरणात तिचा कथित पती विक्की गोस्वामी याचेही नाव समोर आले असून तो आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या वादानंतर ममता भारत सोडून दुबई आणि नंतर केनियामध्ये राहू लागली.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;