आठवड्यातून 90 तास कामाचं विसरा, 200 कंपन्या करणार कायम स्वरुपी चार दिवसांचा आठवडा, तीन दिवस सुट्टी!

आठवड्यातून 90 तास कामाचं विसरा, 200 कंपन्या करणार कायम स्वरुपी चार दिवसांचा आठवडा, तीन दिवस सुट्टी!

हिंदुस्थानात कामाच्या तासांबाबत वाद सुरु असतानाच दुसरीकडे ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यूकेमधील 200 कंपन्या चार दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करणार आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार नाही. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ब्रिटनमधील कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

कर्मचाऱ्यांना आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगता यावे यासाठी ब्रिटनमधील 200 कंपन्यांकडून ‘फोर डे वीक फाऊंडेशन’ योजना राबवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना आता चार दिवस काम आणि तीन दिवस साप्ताहिक सुट्टी लागू होणार आहे.

ब्रिटनमधील या 200 कंपन्यांमध्ये धर्मादाय संस्था, मार्केटिंग आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रातील कंपन्या आहेत. यात 30 कंपन्या विपणन, जाहिरात आणि प्रसारमाध्यमे क्षेत्रांतील आहेत. धर्मादाय, स्वयंसेवी संस्था (एनजीओ) आणि सामाजिक सेवा उद्योगातील 29 संस्था तर तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील 24 तसेच व्यवसाय, सल्लागार आणि व्यवस्थापन क्षेत्रातील 22 कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांमधील पाच हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना ‘फोर डे वीक फाऊंडेशन’ चा लाभ मिळणार आहे.

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, फाउंडेशनचे मोहीम संचालक जो रायल यांनी “पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याला” आर्थिक युगातील एक हँगओव्हर म्हणून अधोरेखित केले आहे. दिवसा 9 ते 5 कामकाज, पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याचा शोध 100 वर्षांपूर्वी लागला होता. पाच दिवसांचा आठवडा आता कालबाह्य झाले असून भविष्यात ते राबवणे अयोग्य ठरेल. आता नवीन स्वरुप राबवणे गरजेचे आहे, असे रायल यांनी पुढे नमूद केले.

या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना 50 टक्केहून अधिक मोकळा वेळ मिळेल. तसेच त्यांना आनंदी आणि अधिक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी स्वातंत्र्य मिळेल. तसेच कंपन्यांना कर्मचाऱ्यांना आकर्षित करून कमी तासांत अधिक उत्पादन सुधारण्यास फायदेशीर ठरेल, असेही रायल म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;