दाट धुक्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले, गाडी थेट कालव्यात कोसळली; 10 जण बेपत्ता

दाट धुक्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले, गाडी थेट कालव्यात कोसळली; 10 जण बेपत्ता

दाट धुक्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने क्रूझर गाडी कालव्यात कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात 10 जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. एका 10 वर्षाच्या बालकाला वाचवण्यात यश आले असून एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. हरियाणातील फतेहाबादमध्ये शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

गाडीत चालकासह 13 जण होते. सर्वजण पंजाबमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून रात्री परतत असताना फतेहाबादमधील भाखडा कालव्यावरील पुलावर दाट धुक्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर कार थेट कालव्यात कोसळली. चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी घेतल्याने तो बचावला आहे.

गाडीतील 12 जण कालव्यात पडले. यापैकी 10 वर्षाचा मुलगा सुदैवाने बचावला असून एका 55 वर्षीय इसमाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर अन्य 10 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;