लक्ष्यवेधी – देशभरातून महत्त्वाच्या बातम्या

लक्ष्यवेधी – देशभरातून महत्त्वाच्या बातम्या

बीएसएनएलच्या फ्री सर्व्हिसमध्ये 300 चॅनेल 

बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक खास नवीन सर्व्हिस सुरू केली आहे. बीएसएनएलची ही सर्व्हिस थेट मोबाईल टीव्ही सर्व्हिस बीआयटीव्ही आहे. ही सेवा संपूर्ण भारतातील बीएसएनएल मोबाइल वापरकर्त्यांना प्रीमियम चॅनेलसह 450 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल पाहता येईल. बीएसएनएल एंटरटेनमेंटसह, बीएसएनएल ग्राहक 450 प्लस लाईव्ह टीव्ही चॅनेल, ब्लॉकबस्टर चित्रपट आणि वेब सिरीजसह भक्तीफ्लिक्स, शॉर्टफंडली, कांचा लंका, स्टेज, ओएम टीव्ही, प्लेफ्लिक्स, फॅनकोड, डिस्ट्रोसारख्या ओटीटीचा आनंद घेऊ शकतात.

‘सेबी’ला मार्चमध्ये मिळणार नवा अध्यक्ष

शेअर बाजार नियामक अर्थात सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांचा कार्यकाळ येत्या 28 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे मार्च महिन्यात सेबीला नवा अध्यक्ष मिळण्याची दाट शक्यता आहे. सरकारकडून या पदासाठी अर्ज मागवले आहेत. माधबी पुरी बूच यांनी 2 मार्च 2022 साली सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला होता. खासगी क्षेत्रातून या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अखेरची डेडलाईन 17 फेब्रुवारी आहे. माधबी यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ अनेक वादांनी गाजला.

बॉयफ्रेंडला घेऊन तरुणीची स्वतःच्या घरात चोरी

अहमदाबादमधील एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन स्वतःच्या घरात चोरी केल्याची घटना उघडकीस आली. घरात बसवलेल्या सीसीटीव्ही पॅमेऱ्यात ही घटना पैद झाली. मुलीच्या वडिलांनी मुलगी आणि तिच्या बॉयफ्रेंडविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. ही घटना अहमदाबादमधील शेला अपार्टमेंटमधील असून कपाटातील लॉकरमध्ये काडतुस, लायसन्स, पासपोर्ट, सोन्याचे दागिने असे सर्व मिळून 1.56 लाखांच्या मौल्यवान वस्तू होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;