अवघ्या 44 सेकंदात खेळ खल्लास, शत्रूला धडकी भरवणारी पॉवरफुल पिनाका रॉकेट सिस्टम

अवघ्या 44 सेकंदात खेळ खल्लास, शत्रूला धडकी भरवणारी पॉवरफुल पिनाका रॉकेट सिस्टम

हिंदुस्थानने स्वदेशी रॉकेट लाँचर सिस्टम ‘पिनाका’ची निर्मिती केलेय. ‘पिनाका’मुळे शत्रूची झोप उडणार आहे. अवघ्या 44 सेकंदांत 12 रॉकेट डागता येतील. शत्रू कितीही दूरवर असू द्या, ‘पिनाका’  अचूक वेध घेऊ शकेल. ‘पिनाका’ रॉकेट लाँचर सिस्टमच्या यशस्वी चाचणीनंतर आता त्यांची खरेदी प्रक्रिया सुरू होईल. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने त्याच्या खरेदीस मंजुरी दिली आहे.

गेल्या वर्षी डीआरडीओने ‘पिनाका’ रॉकेट सिस्टमची चाचणी केली होती. वेगवेगळ्या फिल्ड फायरिंग रेंजमध्ये परीक्षण करण्यात आले, जेणेकरून त्याचा आवाका तपासता येईल. ही चाचणी यशस्वी झाली होती. कमी वेळेत जास्त दूरवर मारा अशी ‘पिनाका’ची खासियत आहे. चार सेकंदात एक रॉकेट सोडू शकते. अशी 44 सेकंदात 12 रॉकेट सोडण्याची ‘पिनाका’ची क्षमता आहे. त्याची मारक क्षमता 45 किलोमीटर आहे. म्हणजे हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या सीमांवर पिनाका प्रभावी ठरेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;