Ranji Trophy 2025 – पुजारा-बदोनी-रहाणे ठरले Nervous Nineties चे शिकार, दोन फलंदाज 99 वरच बाद

Ranji Trophy 2025 – पुजारा-बदोनी-रहाणे ठरले Nervous Nineties चे शिकार, दोन फलंदाज 99 वरच बाद

रणजी करंडकात आजचा दिवस नर्वस नाईंटीस ठरला आहे. अजिंक्य रहाणे, चेतेश्व पुजारा आणि आयुष बदोनी यांनी तुफान फटकेबाजी करत धावांची लयलुट केली. परंतु एकाही फलंदाजाला शतक पूर्ण करता आले नाही. तीन्ही खेळाडू 90 ते 100 च्या दरम्यान बाद झाले. त्यामुळे क्रिकेटेप्रेमींचाही हिरमोड झाला.

दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनीने जबरदस्त फटकेबाजी करत 77 चेंडूमध्ये 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 99 धावा केल्या. शतक पूर्ण करण्यासाठी एका धावेची गरज असताना कर्ण शर्माने आयुषला फिरकीच्या जाळ्यात अडकवले. दुसरीकडे अजिंक्य राहणेने मेघालयविरुद्ध दमदार फलंदाजी करत 117 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 96 धावा केल्या. अवघ्या चार धावांनी त्याचे शतक हुकले असून त्याला नफीस सिद्दीकेन बाद केले. तसेच चेतेश्वर पुजाराने असामविरुद्ध 130 चेंडूचा सामना करत 99 धावा चोपून काढल्या. परंतु त्याचेही शतक एका धावेने हुकले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;