Jalna News – दरोडेखोरांचा गावठी पिस्तूलातून गोळीबार, छातीत गोळी लागल्याने युवक गंभीर जखमी

Jalna News –  दरोडेखोरांचा गावठी पिस्तूलातून गोळीबार, छातीत गोळी लागल्याने युवक गंभीर जखमी

छत्रपती संभीजनगर महामार्गावर एका युवकाला लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी युवकावर गोळीबर केला असून 17 वर्षीय शेख इम्रान शेख एजाज याच्या छातीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सदर घटना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नागेवाडीजवल गुरुवारी (30 जानेवारी 2025) रात्री 10.15 च्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील चंदझिरा भागातील स्क्रॅपचा व्यापारी शेख इम्रान शेख एजाज हा 17 वर्षीय युवक चारचाकी ब्रेझा गाडी घेऊन दुरुस्तीसाठी 2 लाख रुपयांची रक्कम घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे गेला होता. कार दुरुस्त झाल्यानंतर काही रक्कम घेऊन तो पुन्हा जालन्याला निघाला होता. त्याने आपली दुरुस्त केलेली गाडी नागेवाडी शिवारात लावली आणि दुचाकी घेऊन तो रात्री चंदनझिरा येथे निघाला होता. याच दरम्यान तीन दरोडेखोरांनी त्याची वाट अडवली. त्यांच्यात झटापट झाली आणि या झटापटीत एका दरोडेखोराने गावठी पिस्तुलातून एक गोळी इम्रानच्या दिशेने झाडली. छातीत गोळी लागल्याने तो खाली पडला आणि दरोडेखोर 95 हजार रुपयांची रक्कम घेऊन पसार झाले.

इम्रान याच्या छातीच्या उजव्या बाजूला गोळी लागली असून नातेवाईकांनी रात्रीच त्याला छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. बी. स्कॉट, सहायक फौजदार सय्यद यांनी आज 31 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन जखमी युवकाचा जवाब नोंदवला आहे. चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;