Dhirendra Shastri : चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना मोक्ष प्राप्ती झाली, धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त वक्तव्य

Dhirendra Shastri : चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना मोक्ष प्राप्ती झाली, धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त वक्तव्य

”जो गंगेच्या काठावर मरेल, तो मरणार नाही तर मोक्ष प्राप्त करेल”, असं वादग्रस्त वक्तव्य बागेश्वरधाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांनी केलं आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर भाष्य करताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मौनी अमावस्येला मध्यरात्री प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 लोकांचा मृत्यू झाला. यातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धीरेंद्र शास्त्री या घटनेवर आपले मत व्यक्त करत आहेत. व्हिडीओमध्ये ते मंचावर बसून प्रवचन करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये शास्त्री यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल बोलताना म्हटलं की, “आज आम्ही काही कमेंट्स वाचत होतो, काही लोकांनी फोनही केले. आमचे काही मित्र, जे कम्युनिस्ट विचारसरणीचे आहेत, आम्हाला सांगत होते, बाबा, आता तुम्ही काय बोलाल? आम्ही बोलणार. देशात दररोज लोक मरत आहेत, काही औषधाविना मरत आहेत, काही आरोग्य व्यवस्थेशिवाय मरत आहेत. काही हृदयविकाराच्या झटक्याने मरत आहेत. या घटनेबद्दल आपण दु:ख व्यक्त करतो, पण एक गोष्ट समजून घ्या, हा महाप्रयाग आहे. मृत्यू सर्वांनाच यायचा आहे, एक दिवस सगळ्यांना जायचे आहे, हे निश्चित. गंगेच्या काठावर कोणी मरण पावला तर तो मरत नाही, त्याला मोक्ष प्राप्त होतो.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;