U-19 Women’s T20 World Cup – हिंदुस्थानच्या युवती विजेतेपदाच्या एक पाऊल दुर, इंग्लंडला धुळ चारल्यानंतर आता लढत दक्षिण आफ्रिकेशी

U-19 Women’s T20 World Cup – हिंदुस्थानच्या युवती विजेतेपदाच्या एक पाऊल दुर, इंग्लंडला धुळ चारल्यानंतर आता लढत दक्षिण आफ्रिकेशी

हिंदुस्थानच्या युवतींनी जबरदस्त प्रदर्शन करत 19 वर्षाखालील युवतींच्या टी-20 विश्वचषक फायनलमध्ये प्रवेश केला आहे. उंपात्य फेरीत टीम इंडियाने इंग्लंडला 9 विकेटने धुळ चारली आहे. इंग्लंडने दिलेले 114 धावांचे आव्हान टीम इंडियाने 1 विकेट गमावत पूर्ण केले आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. टीम इंडियाची अंतिम लढत 2 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. टीम इंडियाला सलग दुसऱ्यांचा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. 2023 झालेल्या पहिल्या हंगामात टीम इंडियाने विजेतेपद पटकावले होते.

इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडला प्रथम फलंदाजी करताना 8 गड्यांच्या मोबदल्यात 113 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धारधार गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना झटपट बाद केले. परुणिका सिसोदिया आणि वैष्णवी शर्माने 3-3 विकेट घेतल्या तर, आयुषी शुक्लाने दोन विकेट घेतल्या. विशेष म्हणजे इंग्लंडच्या आठ फलंदाजांना फिरकीपटूंनी आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

इंग्लंडने दिलेले 114 धावांचे आव्हान टीम इंडियाने 1 विकेट गमावत पूर्ण केले. सलामीला आलेल्या गोंगजी त्रिशा आणि जी. कमालिनीने धमाकेदार फटकेबाजी करत 9 षटकात 60 धावा चोपून काढल्या. त्रिशाने 29 चेंडूंमध्ये 35 आणि कमालिनीने 50 चेंडूंमध्ये नाबाद 56 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तसेच सानिका चाळकेने 11 धावांचे योगदान दिले. टीम इंडियाने हा सामना जिंकत फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाचा अंतिम सामना 2 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;