पुण्यानंतर तेलंगणमध्ये आढळला GBS चा पेशंट; महिलेची प्रकृती गंभीर, व्हेंटिलेटवर ठेवलं

पुण्यानंतर तेलंगणमध्ये आढळला GBS चा पेशंट; महिलेची प्रकृती गंभीर, व्हेंटिलेटवर ठेवलं

पुण्यानंतर आता तेलंगणात गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चा पहिला रुग्ण आढळला आहे. सिद्धीपेठ येथील 25 वर्षीय महिलेला जीबीएसची लागण झाल्याचे निदान झाले आहे. तिला किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेची प्रकृती गंभीर असून तिला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.

कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रवीण कुमार यादा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि कुटुंब अलिकडच्या काळात पुण्याला गेलेले नाही. मात्र जीबीएसची लागण तेव्हा होते जेव्हा ताप किंवा अतिसार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. महिलेला सुरुवातीला आठवडाभर दुसऱ्या रुग्णालयात ठेवण्यात आले होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सध्या त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत 127 संशयित जीबीएस रुग्ण आढळले असून त्यापैकी नऊ पुणे जिल्ह्याबाहेरचे आहेत. 72 रुग्णांमध्ये जीबीएसची खात्री झाली असून 20 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत.

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;