युट्युबवर मोफत चित्रपट प्रदर्शित केले पाहिजेत, आमीर खानचा मुलगा जुनैद खान स्पष्टच बोलला

युट्युबवर मोफत चित्रपट प्रदर्शित केले पाहिजेत, आमीर खानचा मुलगा जुनैद खान स्पष्टच बोलला

आमीर खानचा मुलगा जुनैद खानचा नवीन चित्रपट ‘लवयापा’ लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जुनैद खान सध्या सह-कलाकार अभिनेत्री खुशी कपूरसोबत त्याच्या आगामी ‘लवयापा’ चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या दरम्यान जुनैदने एका मुलाखतीत चित्रपटांविषयी आपले वक्तव्य मांडले आहे. त्यामध्ये त्याने असे सांगितले की, चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी थिएटरमध्ये यावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, हा चित्रपट YouTube वरही मोफत प्रदर्शित झाला पाहिजे.

तसेच मुलाखतीदरम्यान जुनैदला विचारण्यात आले की OTT आणि थिएटरमधील वादामुळे तुम्हाला काही फरक पडतो का? या मुद्द्यावर जुनैदने स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, मला या दोघांमध्ये असा कोणताही फरक दिसत नाही. मला वाटतं शेवटी, चित्रपट हा चित्रपटच असतो आणि आपल्याला खूप जवळचा असतो. मात्र त्याला चांगल्या पद्धतीने कसा प्रदर्शित करणे हा निर्णय सर्वस्वी निर्मात्यांचा आहे. शेवटी मी एक अभिनेता आहे. माझ्यासाठी हा चित्रपट युट्युबवर प्रदर्शित होणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून हा चित्रपट सर्व लोकांना पाहायला मिळेल. मात्र हे शक्य नाही, अशी खंत जुनैद खानने व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;