सोशल मीडियावर अधिक वेळ घालवणं मानसिक आरोग्यासाठी हानिकारक – आर्थिक सर्वेक्षण

सोशल मीडियावर अधिक वेळ घालवणं मानसिक आरोग्यासाठी हानिकारक – आर्थिक सर्वेक्षण

आर्थिक सर्वेक्षण-2025 मध्ये तरुणांच्या मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. धावपळीच्या जीवनात आभासी जगात किंवा सोशल मीडियावर मोकळा वेळ घालवण्याची सवय मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे यात सांगण्यात आलं आहे. मुख्य आर्थिक सल्लागार वेनांथा नागेश्वरन यांनी सर्वेक्षणात म्हटले आहे की, मोकळ्या वेळेत व्यायाम न करणं किंवा कुटुंबासोबत वेळ न घालवता तो सोशल मीडियावर घालवणं हे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. जर देशाला आपल्या आर्थिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर दैनंदिन जीवनात आपण कशाला प्राधान्य दिलं पाहिजे, या बाबाच्या पर्यायांवर त्वरित लक्ष दिलं पाहिजे.

सर्वेक्षणात असेही म्हटले आहे की, मानसिक आरोग्य म्हणजे जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची आणि उत्पादकपणे काम करण्याची क्षमता आहे. मानसिक आरोग्यामध्ये आपल्या सर्व मानसिक, भावनिक, सामाजिक, संज्ञानात्मक आणि शारीरिक क्षमतांचा समावेश होतो.

उत्पादनक्षमतेसाठी जीवनशैलीच्या निवडी, कामाच्या ठिकाणची संस्कृती आणि कौटुंबिक परिस्थिती महत्त्वाच्या आहेत, हे या आर्थिक सर्वेक्षण हायलाइट करण्यात आलं आहे. आर्थिक सर्वेक्षणात असंही सांगण्यात आलं आहे की, किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आरोग्य समस्यांमध्ये वाढ अनेकदा इंटरनेट आणि विशेषतः सोशल मीडियाच्या अतिवापराशी संबंधित आहे.

यात सांगण्यात आलं आहे की, मुलांनी अधिक वेळ आपल्या मित्रांसोबत घालवावा. इंटरनेट आणि मोबाईलचा वापर कमी करून जास्त वेळ घराबाहेर खेळल्यास मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;