लग्नाशिवाय आई होण्याची अभिनेत्रीची इच्छा, काय आहे तिचा विचार? वाचा…

लग्नाशिवाय आई होण्याची अभिनेत्रीची इच्छा, काय आहे तिचा विचार? वाचा…

टीना दत्ताने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. कलर्स टीवीवरील ‘उतरन’ मालिकेतील इच्छा ची भूमिका करणारी टीना दत्ता बिग बॉसमुळे लोकांपर्यंत पोहोचली. टीनाने दिलेल्या एका मुलाखतीत भविष्यातील नियोजनाबद्दल सांगितले आहे. टीनाला सरोगसी किंवा बाळ दत्तक घेऊन आई होण्याची इच्छा आहे. सध्या टीना दत्ता अविवाहित आहे.

भविष्यातील नियोजनाबद्दल बोलताना, टीना म्हणाली की तिला लग्नाशिवाय आई होण्यास काहीच हरकत नाही आणि सध्या ती अशा व्यक्तीचा विचार करत आहे ज्याच्यासोबत ती लग्न न करताही आई होऊ शकते. मात्र, टीनाला लग्न करण्याची घाई नाही, असेही ती म्हणाली. भविष्यात दत्तक किंवा सरोगसीद्वारे आई होण्याचा विचार करू शकते. तसेच मी कधीही एकटी आई होण्याचा विचारही केला नव्हता. पण मूल दत्तक घेणे असो किंवा सरोगसीद्वारे आई होणे असो, मी हा पर्याय स्वतःसाठी खुला ठेवला आहे, असे तिने सांगितले.

तसेच टीना सुष्मिता सेन सारख्या अभिनेत्रींची खूप मोठी चाहती आहे. सुष्मिताने ज्या पद्धतीने दोन मुली दत्तक घेतल्या आहेत. तसचं टीनाला विश्वास आहे की ती तिच्या आयुष्याबाबत जो काही निर्णय घेईल, तिचे पालक तिला पाठिंबा देतील. माझे आई-वडील कोलकात्यातील एका छोट्या शहरातील आहेत. आम्ही एका बंगाली कुटुंबातील आहोत. एका छोट्या शहरात राहूनही आमची विचारसरणी खूप प्रगतीशील आहे आणि म्हणूनच जर मी भविष्यात सरोगसीद्वारे आई झाली किंवा मूल दत्तक घेतले तर मला खात्री आहे की माझे पालक माझ्या मताचा आदर करतील आणि तुम्हीही मला पूर्णपणे पाठिंबा द्याल. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची एकटी काळजी घेऊ शकते, तर मुलांचीही एकटी काळजी घेऊ शकते. स्वतःची आणि मुलांची काळजी घेण्यासाठी पतीची गरज नाही. एकटीच ही जबाबदारी पार पाडण्यासाठी समर्थ आहे, असे टीना दत्ताने म्हटले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;