Ghazipur Accident – महाकुंभ मेळ्यातून परतताना भाविकांच्या वाहनाला अपघात, मागून येणाऱ्या ट्रकने 8 जणांना चिरडलं

Ghazipur Accident – महाकुंभ मेळ्यातून परतताना भाविकांच्या वाहनाला अपघात, मागून येणाऱ्या ट्रकने 8 जणांना चिरडलं

उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये शुक्रवारी भीषण अपघात झाला आहे. येथील वाराणसी-गाझीपूर-गोरखपूर महामार्गावर  महाकुंभ मेळ्याहून परतणाऱ्या पिकअपची एक्सल तुटल्याने त्यात बसलेले लोक रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांना चिरडले. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला, चार पुरुषांसह एका लहान मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

गोरखपूरच्या बांसगाव भागातील हल्दीचक आणि बलोचक येथील 22 जण त्या पिकअपमधून प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात स्नानासाठी गेले होते. शुक्रवारी दुपारी सर्वजण गोरखपूरला परतत होते. दरम्यान वाराणसी-गाझीपूर-गोरखपूर मार्गावर पीकअपचे एक्सल अचानक तुटल्याने त्यातील प्रवासी खाली पडले आणि त्याचदरम्यान मागून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांना चिरडले. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच डीएम आर्यका अखौरी घटनास्थळी पोहोचले. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त करत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;