Budget 2025: सोनिया गांधींवर भाजपकडून होणाऱ्या टीकेवर प्रियंका गांधींचे उत्तर

Budget 2025: सोनिया गांधींवर भाजपकडून होणाऱ्या टीकेवर प्रियंका गांधींचे उत्तर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर ‘त्या थकलेल्या वाटल्या, बिचाऱ्या’ अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना भाजपच्या नेत्यांनी लक्ष्य केलं आहे. तर सोनिया गांधी यांच्यावर भाजप नेत्यांकडून होणाऱ्या टिकेला काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी उत्तर दिलं आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या की सोनिया गांधी आता 78 वर्षांच्या आहे आणि त्यांचा ‘अनादर करण्याचा हेतू नव्हता’.

प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केलं की, ‘माझी आई 78 वर्षांची महिला आहे; तिने फक्त असं म्हटलं आहे की ‘राष्ट्रपतींनी इतके मोठे भाषण वाचले आणि त्या थकल्या असतील, बिचाऱ्या.’ ती (आई) हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींचा पूर्ण आदर करते. मला वाटते की माध्यमांनी अशा प्रकारच्या गोष्टीचा विपर्यास केला आहे हे खूप दुर्दैवी आहे. त्या दोघीही आदरणीय व्यक्ती आहेत आणि आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. हे स्पष्ट आहे की त्यांचा अनादर करण्याचा हेतू नाही’.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषण केले. त्यानंतर सोनिया गांधी यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. तेव्हा, ‘राष्ट्रपती भाषणाच्या शेवटी थकल्यासारख्या वाटल्या, बिचाऱ्या’, असं सोनिया गांधी म्हणाल्या. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. हा केवळ राष्ट्रपतींचा नाही तर आदिवासी समाजाचा अवमान असून सर्वांची माफी सोनिया गांधी यांनी मागावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधींच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, राष्ट्रपती एका गरीब कुटुंबातून येतात पण काँग्रेसच्या राजघराण्यातील लोकांनी ‘त्यांचा अपमान केला’. हा आदिवासी लोकांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;