Mahakumbh 2025 – भाविकांसाठी बनवल्या जाणाऱ्या जेवणात वाळू टाकणारा पोलीस अधिकारी निलंबित

Mahakumbh 2025 – भाविकांसाठी बनवल्या जाणाऱ्या जेवणात वाळू टाकणारा पोलीस अधिकारी निलंबित

प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात भाविकांसाठी आयोजित केलेल्या भंडाऱ्याच्या जेवणात एका पोलीस अधिकाऱ्याने वाळू टाकली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना आता त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी सोशल मीडियावरही तक्रार केली होती. या घटनेचा व्हिडीओ समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही शेअर केला होता.

वृत्तानुसार, गंगा नगरचे डीसीपी कुलदीप सिंह गुणवत यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओ समोर आल्यानंतर सोराव स्टेशनचे हाऊस ऑफिसर ब्रिजेश कुमार तिवारी यांच्यावर कारवाई केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पोलीस अधिकाऱ्याने चुलीवर बनवल्या जाणाऱ्या अन्नामध्ये वाळू टाकल्याचे दिसून येते. एका युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत तो गंगा नगरच्या डीसीपी यांच्या अकाऊंटला टॅग करत या प्रकरणातील अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर गंगानगरच्या अधिकृत अकाऊंटवरून उत्तर देण्यात आले आहे. त्या व्हिडीओची दखल घेत पोलीस उपायुक्त (गंगा नगर) यांनी  ब्रिजेश कुमार तिवारी या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच विभागीय कारवाई सुरू आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही हा व्हिडिओ सोशलमीडियावर शेअर केला होता.


अखिलेश यादव यांनी आपल्या एक्सवर म्हटले होते की, अत्यंत दुर्देवी घटना आहे. एकाबाजूला महाकुंभात अडकलेल्या लोकांना अन्न-पाण्याची व्यवस्था करणाऱ्यांचे प्रयत्न राजकीय द्वेषामुळे हाणून पाडले जात आहेत. लोकांनी याकडे लक्ष द्यायला हवे, असे अखिलेश यादव म्हणाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;