Ranji Trophy 2025 – विराट कोहली फेल, दिल्लीच्या कर्णधाराची बॅट तळपली; चौकार अन् षटकारांचा पाऊस

Ranji Trophy 2025 – विराट कोहली फेल, दिल्लीच्या कर्णधाराची बॅट तळपली; चौकार अन् षटकारांचा पाऊस

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली 13 वर्षांनी रणजी करंडक खेळण्यासाठी मैदानात उतरला. त्यामुळे त्याचा खेळ पाहण्यासाठी दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम खचाखच भरले होते. परंतु किंग कोहलीची बॅट म्यानातून काही बाहेर आलीच नाही आणि तो अवघ्या 6 या धावसंख्येवर बाद झाला. विराट कोहलीचा वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवान याने त्रिफळा उडवला. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. परंतु दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनीने तुफान फटकेबाजी करत चाहत्यांनी मन जिंकली.

विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करता यावी म्हणून कर्णधार आयुष बदोनीने आपल्या चौथ्या नंबरचा त्याग करत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास उतरला. त्याने मैदानावर येताच आक्रमक फटकेबाजी करत रेल्वेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. आयुष बदोनीने पहिल्या डावात 77 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 99 धावा चोपून काढल्या. अवघ्या एक धावेने त्याचे शतक हुकले. त्याला फिरकीपटू कर्ण शर्मा याने बाद केले. कर्णधाराच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे दिल्लीच्या संघाने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाअखेर दिल्लीच्या संघाने 93 धावांची आघाडी घेत 334 धावा केल्या आहेत. रेल्वेने आपल्या पहिल्या डावात सर्व गडी बाद 241 धावा केल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;