Budget 2025: शेवटी राष्ट्रपती थकलेल्या वाटल्या, बिचाऱ्या! अभिभाषणावर सोनिया गांधीची प्रतिक्रिया, भाजपकडून लक्ष्य

Budget 2025: शेवटी राष्ट्रपती थकलेल्या वाटल्या, बिचाऱ्या! अभिभाषणावर सोनिया गांधीची प्रतिक्रिया, भाजपकडून लक्ष्य

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी (budget 2025) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी शुक्रवारी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, राष्ट्रपती त्यांच्या भाषणाच्या शेवटी ‘थकल्यासारख्या’ वाटल्या आणि ‘बोलणेही कठीण झाले.’

राष्ट्रपतींच्या भाषणानंतर संसदेच्या बाहेर आलेल्या सोनिया गांधी पत्रकारांनी घेरलं आणि प्रतिक्रिया विचारली. यावेळी सोनिया गांधी थेट कुणाशी बोलल्या नाहीत, पण अगदी कमी आवाजात त्या म्हणाल्या की, ‘शेवटी राष्ट्रपती खूप थकल्यासारख्या वाटत होत्या. त्यांना बोलणेही कठीण झाले होते, बिचाऱ्या’.

सोनिया गांधींच्या या प्रतिक्रियेनंतर आता भाजपच्या नेत्यांनी त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवाते केली आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या विधानाचा निषेध केला आणि सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

सोनिया गांधी यांनी ‘बिनशर्त माफी’ मागावी अशी मागणी भाजप अध्यक्ष नड्डा यांनी केली. तर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राष्ट्रपती आदिवासी असल्याचे सोनिया गांधीना सहन होत नसल्याची टीका केली आहे.

‘काँग्रेस पक्षाने माननीय राष्ट्रपती आणि देशातील आदिवासी समाजाची बिनशर्त माफी मागावी’, अशी मागणी नड्डा यांनी X वरील पोस्टमधून मधून केली आहे.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही सोनिया गांधी यांच्या वक्तव्यावर टीका केली आणि काँग्रेस अहंकारी असल्याचा प्रत्यारोप केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;