Mahakumbh 2025 – प्रयागराजनंतर वाराणसीतही वाढली गर्दी, गंगा आरतीवर बंदी

Mahakumbh 2025 – प्रयागराजनंतर वाराणसीतही वाढली गर्दी, गंगा आरतीवर बंदी

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी होऊन तब्बल 30 जणांचा मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून वाराणसीच्या घाटांवर होणारी गंगा आरती 5 फेब्रुवारीपर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. वाढती गर्दी पाहता नुकताच हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त मोहित अग्रवाल यांनी काशीतील लोकांना विनाकारण घराबाहेर पडू नये आणि यात्रेकरूंना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, गंगा सेवा निधीचे अध्यक्ष सुशांत मिश्रा यांनी शुक्रवारी सांगितले की, दशाश्वमेध घाटावर होणारी प्रसिद्ध गंगा आरती सर्वसामान्यांसाठी 5 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. तसेच शितळा घाट, अस्सी घाट व इतर घाटांवर आरती आयोजित करणाऱ्या समित्यांनीही भाविकांना 5 फेब्रुवारीपर्यंत न येण्याचे आवाहन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;