तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या टीमला मोठं यश; जगातील अत्यंत दुर्मिळ ‘चन्ना अ‍ॅम्फिबिअस’ माशाचा तब्बल 80 वर्षांनी लावला शोध

तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या टीमला मोठं यश; जगातील अत्यंत दुर्मिळ ‘चन्ना अ‍ॅम्फिबिअस’ माशाचा तब्बल 80 वर्षांनी लावला शोध

वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या टीमला एक मोठे यश आले आहे. 80 वर्षांपूर्वी आढळलेला आणि नामशेष झाल्याचे मानण्यात आलेल्या ‘चन्ना अ‍ॅम्फिबिअस’ या जगातील अत्यंत दुर्मिळ माशाचा पुन्हा शोध लावण्यात यश आले आहे.

तब्बल 80 वर्षांनंतर ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन (TWF) चे वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे, वन्यजीव संशोधक जयसिंहन प्रवीणराज आणि इतर संशोधकांनी जगातील सर्वात दुर्मिळ, आकर्षक आणि सापासारखे डोके असलेल्या माशांच्या प्रजातींपैकी एक ‘चन्ना अ‍ॅम्फिबिअस’चा माशाचा पुन्हा शोध लावला आहे. या पुनर्शोधावरील शोधनिबंध नुकताच 31 जानेवारी 2025 रोजी Zootaxa मध्ये प्रकाशित झाला. या यशामागील संशोधकांमध्ये तेजस ठाकरे, आघाडीचे लेखक जयसिंहन प्रवीणराज, नल्लाथांबी मौलीधरन, बालाजी विजयकृष्णन आणि गौरब कुमार नंदा यांचा समावेश आहे.

जगातील अत्यंत दुर्मिळ आणि सर्वाधिक आकर्षक सापासारखे डोके असलेल्या माशांच्या प्रजातींपैकी एक असलेल्या ‘चन्ना अ‍ॅम्फिबिअस’ माशाचा पुन्हा शोध लागल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. चेल नदी संरचनेत 1840 मध्ये वर्णन केलेल्या आणि मध्यंतरी वारंवार शोध घेऊनही शास्त्रज्ञांना यश न आलेल्या या प्रजातीची शेवटची नोंद 80 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. यामुळे काहींनी माशाची ही प्रजाती नामशेष झाल्याचे मानले होते, असे तेजस ठाकरे यांनी म्हटले.

सामान्यतः चेल स्नेकहेड म्हणून ओळखली जाणारी ही मोठी आणि अत्यंत आकर्षक माशाची प्राजाती आहे. चमकदार पिवळे ते केशरी पट्टे, डोळ्याच्या खाली एक चमकदार निऑन पॅच आणि गचुआ गटातील सर्व स्नेकहेडमध्ये सर्वात जास्त रेषांमुळे ही प्रजाती ओळखली जाते. ही प्रजाती पुन्हा आढळून आल्याने जैव विविधतेला बळ मिळेल आणि त्यांच्या संरक्षणासाठीही नवी दिशा मिळेल, अशी आपेक्षा तेजस ठाकरे यांनी व्यक्त केली.

जैव विविधता वाचवण्यासाठी शोधात सातत्य आणि संवर्धनाची आवश्यकता आहे. यापूर्वी 2024 मध्ये तीन नव्या प्रजातींच्या शोधाने त्यांच्या संरक्षणाची नवी आशा निर्माण केली होती होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;