सलमान खानची बहीण रस्ते अपघातात गंभीर जखमी, फोटो समोर येताच सर्वत्र खळबळ

सलमान खानची बहीण रस्ते अपघातात गंभीर जखमी, फोटो समोर येताच सर्वत्र खळबळ

अभिनेता सलमान खान याची मालेली बहीण श्वेता रोहिरा याचा रस्ते अपघात झाला आहे. श्वेता हिने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट करत अपघात झाल्याची माहिती दिली आहे. श्वेतावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिने इंस्टाग्रामवर हॉस्पिटलच्या बेडवर गंभीर अवस्थेत असल्याचे फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये श्वेता जखमी दिसत आहे. शिवाय अपघातात तिचे ओठ देखील फाटले आहेत.

अपघाताची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत श्वेता म्हणाली, ‘लाईफ इज फूल ऑफ सरप्राईज… आहे ना? #kalhonaho गाणं गात असताना दिवसाची योजना आखत असतो आणि पुढच्या क्षण आयुष्य म्हणतं ‘माझी चाय पकड’ तेवढ्यात एक बाईक येते. माझा कोणताही दोष नसतानाही, मी स्वतःला चालण्यापासून उडताना पाहिलं आणि थेट येथे पोहोचली…

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Rohira (@shwetarohira)

 

पुढे श्वेता म्हणते, ‘सत्य तर असं आहे की, कधी कधी आयुष्य आपल्याला पूर्णपणे हादरवून टाकतं. कारण आयुष्याला आपल्याला आणखी बळकट करायचं असतं. अखेर विनाशच निर्मितीचा प्रशस्त मार्ग आहे…’ असं देखील श्वेता पोस्टमध्ये म्हणाली आहे.

श्वेता रोहिरा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, श्वेता, सलमान खान याची मानलेली बहीण आहे. श्वेता हिच्या लग्नाची जबाबदारी देखील सलमान खान याने घेतली होती. सलमान खान याने श्वेताचं लग्न 2014 मध्ये अभिनेता पुलकित सम्राट याच्यासोबत लावून दिलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

लग्नाच्या फक्त एका वर्षानंतर श्वेता आणि पुलकित यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. श्वेता हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर पुलकित याने दुसरा संसार थाटला. पुलकित याने अभिनेत्री क्रिती खरबंदा हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. श्वेता मात्र आजही एकटीच आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;