“स्वत: संन्यासी बनून बिझनेस केला अन्..”; ममता कुलकर्णीवर टीका करणाऱ्या बाबा रामदेव यांना राखी सावंतचं उत्तर

“स्वत: संन्यासी बनून बिझनेस केला अन्..”; ममता कुलकर्णीवर टीका करणाऱ्या बाबा रामदेव यांना राखी सावंतचं उत्तर

योगगुरू बाबा रामदेव यांनी अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या संन्यास घेण्यावरून टीका केली. एका दिवसात कोणी साधूसंत बनत नाही, असं ते म्हणाले. त्यावरून आता अभिनेत्री राखी सावंतने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही संन्यासी बनून बिझनेस केलात आणि आता ममता कुलकर्णीचं संन्यास घेणं तुम्हाला आक्षेपार्ह वाटतंय, अशा शब्दांत तिने टीका केली. ममताने महाकुंभमध्ये संन्यास घेतला असून किन्नर अखाड्याची ती महामंडलेश्वर बनली. मात्र यावरून काही साधू-संतांनी आक्षेप नोंदवला होता. “महाकुंभ हे सनातन धर्मातील एक भव्य उत्सव आहे. हे एक पवित्र पर्व आहे. काही लोक कुंभच्या नावाआड अश्लीलता, नशा आणि गैरव्यवहार करत आहेत. तर काही लोक, जे कालपर्यंत सांसारिक सुखांमध्ये मग्न होते, अचानक एका दिवसात ते संत बनले आहेत. त्यांना महामंडलेश्वरची उपाधी दिली जात आहे”, असा टोला बाबा रामदेव यांनी लगावला होता.

काय म्हणाली राखी सावंत?

“बाबा रामदेव यांनी अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या महामंडलेश्वर बनण्यावरून आक्षेप घेतला आहे. ममताने नव्वदच्या दशकात मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम केलंय. आता तिच्या संन्यास घेण्यावरून बाबा रामदेव यांनी अभद्र शब्द वापरले आहेत. जी मुलगी बॉलिवूडमधून आली, ग्लॅमर वर्ल्डमध्ये राहिली, ती संन्यासी बनू शकत नाही, असं ते म्हणाले. मी त्यांना बोलू इच्छिते की, बाबा रामदेवजी.. तुम्ही तर संन्यासी असून बिझनेस केला. मार्केटमध्ये तुम्ही तेल, बिस्किटपासून अशा अशा गोष्टी विकल्या आहेत, हे लज्जास्पद आहे. भगवे कपडे घातल्याने कोणी साधू बनत नाही. तुम्ही लोकांना चुना लावला आहे. त्यामुळे ममता कुलकर्णीबद्दल तुम्ही काही न बोललेलंच बरं आहे”, असं राखी म्हणाली.

“ममता कुलकर्णीची बाजू कोणी नाही घेतली तरी मी तिच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. 25 वर्षांनंतर ती भारतात आली आणि कुंभमेळ्यात रडत-रडत तिने संन्यास घेतला. तिचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे. पण तुम्हाला तिच्याबद्दल ईर्षा वाटू लागली आहे. एक मुलगी या संसाराचा, तोकड्या कपड्यांचा, अश्लीलतेला त्याग करून संन्यास घेतेय, याचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे”, असा सल्ला राखीने बाबा रामदेव यांना दिला.

“ममता कुलकर्णी.. तू अशा लोकांचं बोलणं मनावर घेऊ नकोस, त्यांना सडेतोड उत्तर दे. तू काहीच चुकीचं केलं नाहीस. बाबा रामदेवजींचा मी खूप आदर करते. पण तुम्ही ममता कुलकर्णीबद्दल जे वक्तव्य केलं, ते चुकीचं आहे. तुम्ही तिचं कौतुक करायला हवं. तुम्ही संन्यासी बनून बिझनेसमन बनले. भगवे वस्त्र परिधान करून तुम्ही बिझनेस केला आहे, तुम्ही लोकांना लुटत आहात”, अशी थेट टीका तिने केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;