Santosh Deshmukh Case – आरोपी सुदर्शन घुले SIT कोठडीतून बाहेर, मकोका कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Santosh Deshmukh Case – आरोपी सुदर्शन घुले SIT कोठडीतून बाहेर, मकोका कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. डिजिटल इव्हिडन्सच्या आधारे प्रकरणाच्या चौकशीसाठी सुदर्शन घुले याला पाच दिवसाची एसआयटी कोठडी देण्यात आली होती. ही कोठडी संपल्याने घुलेला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

बीड मकोका न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुदर्शन घुलेला हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकील ॲड.बाळासाहेब कोल्हे यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली. मात्र या प्रकरणात केव्हाही पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार तपास यंत्रणेला असणार आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;