जातीचं पाठबळ असणाऱ्यांना कायदा हात लावत नाही, फडणवीस, अजित पवार यांचीही तीच भूमिका; धनंजय मुंडेंवरून सजय राऊत यांचा निशाणा

जातीचं पाठबळ असणाऱ्यांना कायदा हात लावत नाही, फडणवीस, अजित पवार यांचीही तीच भूमिका; धनंजय मुंडेंवरून सजय राऊत यांचा निशाणा

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. देशमुख यांची हत्या व वाल्मीक कराड खंडणी प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे कराड यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, मुंडेनी राजीनाम्याचा बोजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माथी मारला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंडेंना पाठीशी घालत असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते , खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. या देशात राज्यात धर्माचं आणि जातीचं राजकरण मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ज्याच्यामागे जातीचं पाठबळ आहे त्यांना आपला कायदा हात लावत नाही, कारण मतं जातील. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची देखील भूमिका तिचं आहे. ज्याच्यामागे त्याच्या जातीची मतं आहेत. त्याच्याबाबतीत कायदा नरम आणि वाकलेला असतो. जे कायद्याचे चौकीदार आहे, गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा जातीची ताकद बघून त्या नेत्याच्या मागे आहेत. त्या नेत्याने काय केलंय की नाही केलंय? याच्यावर विचार करतायत. हे दुर्दैवाने या राज्यात सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले.

धनंजय मुंडेचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील असे म्हणाले होते. ही बॉलची टोलवाटोलवी आहे. गांभीर्य कळत नाहीये, या लोकांना. अमित शहा काय करतायत मग? ते देशाचे गृहमंत्री आहेत. हे सरकार महाराष्ट्रात त्यांनी आणलंय. त्यांनी ईव्हीएम सेट केलेत. त्यांच्यामुळे हा सरळ राज्यातला गोंधळ सुरू आहे. फडणवीस म्हणतात अजित पावर आणि अजित पवार म्हणतात फडणवीस. पण जनतेच्या न्यायालयात निकाल लागलेला आहे. जनता म्हणते जोपर्यंत त्यांची चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यंत त्यांचा राजीनामा घ्या. आणि दोन वरिष्ठ मंत्री टोलाटोली करतायत. महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजतायत, असा हल्लाबोल यावेळी संजय राऊत यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी अशा राजकरणाला खतपाणी घालू नये 

आम्ही सुद्धा समाजासोबत आहोत. आणि हा समाज महाराष्ट्राचा आहे. पण महाराष्ट्रात जाती जातीचं राजकारण सुरू आहे, आणि त्यानुसार नेते आहेत. भाजपने महाराष्ट्राची सूत्र हाती घेतल्यापासून हे राज्य त्यांनी जाती, पोट जात, उपजातीमध्ये फाडून टाकलाय. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तरी अशा प्रकारच्या राजकारणाला खतपाणी घालू नये. मराठी विरुद्ध ओबीसी, या जातीच्या राजकारणामुळे भाजपला जरा चांगले दिवस आलेत, अशी टीका राऊत यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;