इस्त्रायवर हल्ला करणारा मास्टरमाईंड मोहम्मद दईफ ठार, हमासने पहिल्यांदाच दिला दुजोरा

इस्त्रायवर हल्ला करणारा मास्टरमाईंड मोहम्मद दईफ ठार, हमासने पहिल्यांदाच दिला दुजोरा

इस्त्रायल हल्ल्याचा मास्टरमाईंड मोहम्मह दईफ याचा खात्मा करण्यात आला आहे. याबाबत इस्त्रायलने सहा महिन्यांपूर्वीच त्याच्या मृत्यूची घोषणा केली होती. मात्र, हमासने गुरुवारी या वृत्ताला दुजोरा दिला.

हमासने पहिल्यांदाच मोहम्मह दईफ याच्या मृत्यूबाबत स्टेटमेंट दिले आहे. इस्त्रायलने मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये मोहम्मद दईफ मारला गेल्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी महिन्याभरापूर्वी दक्षिणी गाझामध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात दईफ मारला गेला असे सहा महिन्यांपूर्वी सांगितले होते. मात्र, हमासकडून गुरुवारी मोहम्मद दईफ मारला गेल्याचा दुजोरा देण्यात आला.

ब्रिगेडचा प्रवक्ता अबू ओबेदा यानेही अल-कस्सामचा डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ मारवान इस्सा मारला गेल्याचा दुजोरा दिला आहे. तो म्हणाला शत्रूने आपल्या दोन मोठ्या नेत्यांना मारले. पण त्यांचा वारसा आणि प्रतिकार चालूच राहील.’ हमासच्या  नेत्यांच्या हत्येमुळे इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिनींचा संघर्ष थांबणार नाही.

इस्रायलवर हमासने 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड मोहम्मद दईफ हा होता. या हल्ल्यामुळे गाझामध्ये लढाईला तोंड फुटले. मोहम्मद दईफ अनेक वर्षांपासून इस्रायलच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता. गाझा पट्टीतील युद्धबंदी कराराचा भाग म्हणून हमास इस्रायलवरील हल्ल्यांदरम्यान घेतलेल्या ओलिसांना सोडत असताना मोहम्मद दईफच्या मृत्यूला  हमासने दुजोरा दिला आहे. दरम्यान गुरुवारी ओलीस ठेवलेल्या आणखी 8 जणांना सोडण्यात आले. इस्रायलने संध्याकाळी 110 पॅलेस्टिनी कैद्यांना ओलिसांच्या बदल्यात सोडण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये इस्रायल नागरिकांवर प्राणघातक हल्ल्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या 30 कैद्यांचा समावेश आहे. 19 फेब्रुवारीपासून लागू झालेल्या युद्धबंदी करारांतर्गत दोन्ही बाजूंमधील ओलीस आणि कैद्यांची ही तिसरी देवाणघेवाण आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;