मुंबईच्या रस्त्यांवर आदिमानवाच्या वेशात दिसणारा कोणी वेडा नाही… तो आहे बॉलीवुड सुपरस्टार!

मुंबईच्या रस्त्यांवर आदिमानवाच्या वेशात दिसणारा कोणी वेडा नाही… तो आहे बॉलीवुड सुपरस्टार!

सोशल मीडियावर सध्या आदिमानवाच्या वेशात एक व्यक्ती फिरतानाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याला पाहून लोक पळताना दिसत आहेत. लांब केस, वाढलेली दाढी, आदिमानवासारखे कपडे अशा विचित्र अवस्थेत दिसत असलेला हा माणूस कोणी वेडा वगैरे नाही तर हा आहे बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता.

या आदिमानवासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. या व्यक्तीला मुंबईतही पाहण्यात आले. अनेकांनी त्याचे व्हिडीओही काढून शेअर केले. मात्र, कोणालाच तो व्यक्ती नेमका कोण आहे याची ओळख पटली नाही. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान होता. लोक त्याच्या या अनोख्या वेशभूषेमुळे त्याला ओळखूच शकले नाहीत.

ज्यावेळी आमिर खानच्या मेकअपचा व्हिडीओ समोर आला त्यावेळी लोकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्याने एवढे ट्रान्सफॉर्मेशन का केले असावे, त्याचा कोणता आगामी सिनेमा येतोय का? असे प्रश्न पडले असून त्याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत चाहते आहेत. आमिर खान त्याच्या या लूकमुळे सोशल मीडीयावर चर्चेचा विषय बनला आहे. त्याचा आगामी सिनेमा येत असेल, असा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

आमीर खानच्या ट्रान्सफॉर्मेशन बद्दल बोलायचे तर गजनी, दंगल, लाल सिंह चड्ढा सारखे सिनेमे आहेत. ज्यात तो अगदी वेगळ्या अवतारात दिसला. सध्या आमीर खान त्याचा आगामी सिनेमा सितारे जमीन पर मध्ये व्यग्र आहे. हा सिनेमा डिसेंबर 2025 मध्ये सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात दर्शिल सफारी आणि जेनेलिया देशमुख महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;