‘व्होट जिहाद’च्या आरोळ्या मारणाऱ्या भाजपचं खरं रुप समोर; 44 लाख मुस्लिमांनी केली सदस्य नोंदणी

‘व्होट जिहाद’च्या आरोळ्या मारणाऱ्या भाजपचं खरं रुप समोर; 44 लाख मुस्लिमांनी केली सदस्य नोंदणी

भाजपची सदस्यता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला मुस्लिम समुदायाकडूनही प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात जवळपास एक लाख मुस्लिम नागरिकांनी सदस्य नोंदणी केली. तर देशभरात 44 लाख मुस्लिम भाजपचे सदस्य झाले आहेत. महाराष्ट्रात एकूण एक कोटी नागरीक भाजपमध्ये सहभागी झाले. यापैकी एक लाख मुस्लिम नागरीक आहेत. शुक्रवारी 31 जानेवारी रोजी या सदस्य नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. भाजपचे 10 कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य आहे.

भाजपच्या सदस्य नोंदणीबाबत अखिल भारतीय भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रमुख जमाल सिद्दीक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अल्पसंख्याक समुदायाकडून मिळालेला प्रतिसाद खूपच समाधानकारक होता, हे आकडेवारीच सांगत आहे. उत्तर प्रदेशात सहा लाखांहून अधिक मुस्लिमांनी नोंदणी केली, तर मध्य प्रदेशात 3 लाख आणि महाराष्ट्रात एक लाख मुस्लिमांनी नोंदणी केल्याचे सिद्दीक यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत आणि विकासात्मक अजेंडाचा सक्रियपणे भाग बनू इच्छिणाऱ्या अल्पसंख्याकांना आवाहन केले होते. कल्याणकारी योजना त्यांच्या जीवनात फायदेशीर ठरत असल्याचे मुस्लिमांना समजू लागले आहे. यामुळे भाजपपासून दूर असलेला मुस्लिम समाज आता पक्षाच्या जवळ येत असल्याचे सांगितले जात आहे., असेही सिद्दीक पुढे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;