जितक्या नोटा मोजाल, तितक्या घरी घेऊन जा; चीनमधील कंपनीची अजब ऑफर

जितक्या नोटा मोजाल, तितक्या घरी घेऊन जा; चीनमधील कंपनीची अजब ऑफर

चीनमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱयांसाठी एक अजब ऑफर आणली. पंपनीच्या या ऑफरमुळे काही कर्मचारी मालामाल झाले. हिंदुस्थानसह अनेक देशात बोनस थेट बँक खात्यात जमा केला जातो. परंतु, चीनमधील काँघशान व्रेन कंपनीने आपल्या कर्मचाऱयांना एका वेगळ्या पद्धतीने बोनस जाहीर केला. कंपनीने एक मोठा टेबल ठेवला. त्यावर 100-100 युआनच्या नोटांचे बंडल ठेवले. जो कर्मचारी जितक्या नोटा मोजेल तितक्या तो बोनस म्हणून घरी घेवून जाईल, अशी कंपनीने अट ठेवली होती. या टेबलवर एक भांडे ठेवण्यात आले. त्यात चिठ्ठय़ा होत्या. या चिठ्ठय़ा एक मिनिटापासून ते 15 मिनिटांपर्यंत होत्या.

11 लाखांचे बोनस

या ठिकाणी एकूण 20 काउंटर लावण्यात आले. जो कर्मचारी जितक्या नोटा मोजायचा तितक्या नोटा त्याला बोनस म्हणून मिळायच्या. एका कर्मचाऱयाला अक्षरशः जॅकपॉट लागला. त्याने तब्बल 97,800 युआन नोटा मोजल्या. म्हणजेच त्याला 11 लाख 27 हजार 837 रुपये मिळाले. एवढा मोठा बोनस त्याला आनंद झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;