आई कुठे काय करते! काय सांगता! 38 वर्षाची महिला 11 मुलांची आई

आई कुठे काय करते! काय सांगता! 38 वर्षाची महिला 11 मुलांची आई

आई होणे हे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते. परंतु, अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे राहणाऱया इटजेल मेलेंडेज या महिलेचे वय 38 वर्ष असून या वयात इटलेजला तब्बल 11 मुले झाली आहेत. इटजेल अवघ्या 17 वर्षाची होती. त्यावेळी तिने पहिल्यांदा एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर ती सतत मुलांना जन्माला घालत आहे. इटजेलने 20 ऑगस्ट 2004 ला एका गोंडस मुलीला जन्म दिला. ती आता 20 वर्षाची झाली आहे. वय 17 ते 38 या वयात तिने आतापर्यंत 11 मुलांना जन्म दिला आहे. तिच्या पतीचे वय 37 वर्षे आहे. तो एक रिअल इस्टेट एजन्ट आहे. माझ्या मुलांना माझी गरज आहे, हे मला माहिती आहे. परंतु, मी पुन्हा एकदा प्रेग्नंट होते. त्यामुळे आधीच्या मुलांकडे मला जास्त वेळ देता येत नाही. कुटुंब आणि नातलग यांच्याकडून मला खूप पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच मी इतके मोठे कुटुंब सांभाळू शकते. इटजेल एक सलून चालवते. 11 मुले झालेत, आता तरी थांबणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर इटजेलचे नाही असे उत्तर असते. ती म्हणते मी आणखी मुलांना जन्माला घालणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;