लिव्ह इन मध्ये राहताय? मग त्या आधी भरा ‘हा’ 16 पानांचा फॉर्म

लिव्ह इन मध्ये राहताय? मग त्या आधी भरा ‘हा’ 16 पानांचा फॉर्म

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा (युसीसी) लागू झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा लिव्ह इन रिलेशिपबद्दल होतेय. उत्तराखंडच्या धामी सरकारने युसीसीचे नियम बनवले आहेत, त्यामध्ये ‘लिव्ह इन’ बद्दल कडक नियम करण्यात आले आहेत. त्यानुसार ‘लिव्ह इन’च्या नोंदणीसाठी जोडप्यांना 16 पानी फॉर्म भरावा लागेल. याशिवाय विवाह संमतीसंदर्भात पुजारी किंवा धार्मिक नेत्याचे प्रमाणपत्रही द्यावे लागेल. त्यामध्ये असे लिहिलेले असेल की या जोडप्याची इच्छा असेल तर ते विवाह करण्यासाठी पात्र आहेत. जर कुणी जोडप्याने लिव्ह इनची नोंदणी केली नाही, तर त्याला सहा वर्षांची शिक्षा होऊ शकते. उत्तराखंडमध्ये राहणाऱया अन्य राज्यांतील लोकांनाही हे नियम लागू होतील.

युसीसीचे नियम काय आहेत

लिव्हइनसाठी नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येईल. तुम्ही आधीच लिव्ह इनमध्ये आहात की तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये जायची इच्छा आहे, हे सांगावे लागेल. ‘लिव्ह इन’साठी विवाह संमती प्रमाणपत्राची गरज असेल. पुजारी किंवा संबंधित समुदायाच्या धार्मिक नेत्याचे प्रमाणपत्र लागेल. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱया जोडप्याला आधीच्या संबंधांची माहिती द्यावी लागेल. विवाह झालेला आहे का? त्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;