एकलव्य, एस्पायरला अजिंक्यपद; सामना माध्यम प्रायोजक

एकलव्य, एस्पायरला अजिंक्यपद; सामना माध्यम प्रायोजक

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रस्सीखेच स्पर्धेत पुरुष व्यावसायिक गटात एकलव्य संघाने शौर्य स्पोर्ट्सवर मात करत अजिंक्यपद पटकावले तर महिलांच्या गटात एस्पायर संघाने बाजी मारली. ग्रामस्थ आणि क्रीडा मंडळाच्या गटात किणे ग्रामस्थ मंडळाने येमकोंड ग्रामस्थ मंडळाचा पराभव करत जेतेपद काबीज केले. या स्पर्धेला दैनिक ‘सामना’ माध्यम प्रायोजक होते.

वरळी विधानसभेचे उपविभागप्रमुख राम साळगावकर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेला मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना अशा विविध जिह्यांतून हजारो स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. या अभूतपूर्व स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी स्वतः मैदानात उतरून खेळाडूंसोबत रस्सीखेच करत केले.

याप्रसंगी शिवसेना उपनेते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस व आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;