झारखंडमध्ये पोलिसांची यशस्वी कारवाई, तीन नक्षलवाद्यांना अटक

झारखंडमध्ये पोलिसांची यशस्वी कारवाई, तीन नक्षलवाद्यांना अटक

झारखंड पोलिसांनी छत्र जिल्ह्यातील दुलकी नदीजवळील जंगलात कारवाई करत तीन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. तिघेही नक्षलवादी टीएसपीसीचे सक्रिय सदस्य होते.

दुलकी नदीजवळील जंगलात काही नक्षलवादी लपून बसले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे बुधवारी पोलिसांनी परिसरात छापेमारी करत तीन नक्षलवाद्यांना अटक केल्याचे छत्राचे एसपी विकास पांडे यांनी सांगितले.

विकास कुमार यादव, गुड्डू यादव आणि तस्लीम अन्सारी अशी अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. हे सर्वजण काहीतरी घातपात घडवण्याच्या तयारीत होते, असा पोलिसांना संशय असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;