गॉलवर ऑस्ट्रेलियाचीच धमाल; ख्वाजाचे द्विशतक तर इंगलिसचे पदार्पणातच शतक

गॉलवर ऑस्ट्रेलियाचीच धमाल; ख्वाजाचे द्विशतक तर इंगलिसचे पदार्पणातच शतक

गॉलच्या खेळपट्टीवर दुसऱया दिवशीही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनीच धम्माल केली. बुधवारी उस्मान ख्वाजा आणि स्टीव्हन स्मिथने नाबाद शतके झळकावली होती तर आज ख्वाजाने शतकाचे द्विशतकात तर जॉश इंगलिसने पदार्पणातच 90 चेंडूंत शतक ठोकण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांपुढे लंकेच्या गोलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्यामुळे ऑस्ट्रेलियाने 654 धावांचा एव्हरेस्ट उभा केला आणि दुसऱया दिवसअखेर लंकेची 3 बाद 44 अशी दयनीय अवस्था करत पहिल्या कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत केली.

बॉर्डर-गावसकर (बॉगाक) ट्रॉफीमध्ये पाच सामन्यात बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर उस्मान ख्वाजाला मैदानावर फार काळ टिकू दिले नाही. बुमराहने सळो की पळो करून सोडलेल्या ख्वाजाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 10 डावांत केवळ 184 धावा केल्या होत्या तर लंकेविरुद्ध 352 चेंडूमध्ये 16 चैकार आणि एक षटकाराच्या मदतीने 232 धावांची तुफानी खेळी साकारली. श्रीलंकेत अशी कामगिरी करणारा ख्वाजा पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;