हिंदुस्थानी युवतींपुढे इंग्लंडचे कडवे आव्हान; आज हिंदुस्थानी महिलांचा उपांत्य सामना

हिंदुस्थानी युवतींपुढे इंग्लंडचे कडवे आव्हान; आज हिंदुस्थानी महिलांचा उपांत्य सामना

19 वर्षांखालील युवतींच्या टी-20 विश्वचषक’ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारलेल्या हिंदुस्थानी संघापुढे इंग्लंडचे कडवे आव्हान असणार आहे. या स्पर्धेमध्ये हिंदुस्थानने अद्याप एकही सामना गमावला नसल्याने विजयी मालिका कायम ठेवून अंतिम सामन्यात प्रवेश करण्याच्या उद्देशानेच हिंदुस्थानी संघ मैदानात उतरणार आहे.

पहिल्या सामन्यात यजमान मलेशियाला दहा विकेट्सने पराभूत केल्यानंतर हिंदुस्थानने लंकेवर 60 धावांनी मात केली. त्यानंतर बांगलादेशला आठ विकेटनी पराभव केला, तर सुपर सिक्स टप्प्यात स्कॉटलंडवर 150 धावांनी मात केली. निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील संघात त्रिशाने स्कॉटलंडविरुद्ध 59 चेंडूंत 110 धावांची तुफानी खेली केली होती. त्रिशाने स्पर्धेत पाच सामन्यांमध्ये 76.66 च्या सरासरीने 230 धावा केल्या आहेत. इंग्लंडची फलंदाज डेविना पेरिन 131 धावांसह दुसऱया स्थानावर आहे, मात्र उद्याच्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांचे तगडे आव्हान हिंदुस्थानी गोलंदाजांपुढे असेल.

संभाव्य संघ

हिंदुस्थान: निक्की प्रसाद (कर्णधार), सानिया चाळके, गोंगडी त्रिशा, जी. कमलिनी, भाविका अहिरे, ईश्वरी आवासरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी धृती, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एम.डी. शबनम, वैष्णवी एस.

इंग्लंड: अॅबी नॉरग्रोव्ह (कर्णधार), पह्बी ब्रेट, ऑलिव्हिया ब्रिस्डन, टिली कोर्टनी कोलमन, टडी जॉन्सन, केटी जोन्स, शार्लेट लॅम्बर्ट, इव्ह ओ’नील, डेव्हिना पेरिन, जेमिमा स्पेन्स, शार्लेट स्टब्ज, अमृता सुरेनकुमार, प्रीशा ठाणावाला, एरिन थॉमस, ग्रेस थॉम्पसन.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;