जलतरणामध्ये पुन्हा पदकचौकार, सान्वी देशवालचे सोनेरी यश

जलतरणामध्ये पुन्हा पदकचौकार, सान्वी देशवालचे सोनेरी यश

महाराष्ट्राने जलतरणामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पदकांचा चौकार झळकविला. सान्वी देशवालचे सोनेरी यश संपादले. चार बाय शंभर मीटर मिडले रिले शर्यतीमधील पुरुष गटात कांस्य तर महिला गटात रौप्यपदक मिळाले, तर महिलांच्या डायव्हिंगमध्ये ईशा वाघमोडे हिने रौप्य पदक जिंकले.

सान्वी देशवाल हिने 4 बाय 100 मीटर्स वैयक्तिक मिडले प्रकारात सोनेरी यश संपादन केले. तिला ही शर्यत पूर्ण करण्यास पाच मिनिटे 5.49 सेकंद वेळ लागला. पुरुषांच्या विभागात चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत कांस्यपदक मिळवताना महाराष्ट्राच्या संघात ऋषभ दास, पृथ्वीराज डांगे, मिहीर आंब्रे हीर गितेश शहा यांचा समावेश होता. त्यांनी हे अंतर पार करण्यास तीन मिनिटे 48.31 सेपंद वेळ लागला.

महिलांच्या चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत महाराष्ट्राला रुपेरी यश लाभले. ऋजुता राजाज्ञ, ज्योती पाटील, प्रतिष्ठा डांगी व आदिती हेगडे यांच्या समावेश असलेल्या महाराष्ट्राने ही शर्यत चार मिनिटे 31.29 सेकंदांत पार केली. मुलींच्या दहा मीटर प्लॅटफॉर्म ड्रायव्हिंग प्रकारात महाराष्ट्राच्या ईशा वाघमोडे हिला रौप्य पदक मिळाले. तिने या प्रकारात 175.50 गुणांची नोंद केली.

नेमबाजीत महाराष्ट्राने उघडले खाते

नाशिकच्या आर्या बोरसेने अपेक्षेप्रमाणे रूपेरी यशाचा नेम साधून नेमबाजीतील महाराष्ट्राच्या पदकाचे खाते उघडले. संयम व चिकाटी दाखवली की यश हमखास मिळते असे आपण नेहमी म्हणतो. हा प्रत्यय आर्या बोरसे हिच्याबाबत आज येथे दिसून आला. नेमबाजीमधील मधल्या टप्प्यात पिछाडीवर असलेल्या आर्या हिने शेवटच्या टप्प्यात अचूक नेम साधला आणि महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात रौप्यपदक खेचून आणले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;