दारू पिताय सावधान, कॅन्सर होऊ शकतो! बाटल्यांवर इशारा छापण्याच्या मागणीसाठी हायकोर्टात याचिका

दारू पिताय सावधान, कॅन्सर होऊ शकतो! बाटल्यांवर इशारा छापण्याच्या मागणीसाठी हायकोर्टात याचिका

देशात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून तरुण पिढी दारूच्या आहारी जात आहे. हे रोखण्यासाठी सर्व दारूच्या बाटल्यांवर कॅन्सरच्या धोक्याचा इशारा देणारे संदेश छापण्यात यावेत, अशी मागणी करत पुण्यातील तरुणाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची आज न्यायालयाने दखल घेत राज्य व केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.

कॅन्सर रुग्णांचे प्रमाण वाढत असून त्यादृष्टीने शासकीय पातळीवर अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. दारूचे सेवन मोठय़ा प्रमाणात केले जात असून त्याचे विपरीत परिणाम शरीरावर होत आहेत. त्यामुळे दारूच्या बाटल्यांवर कर्करोगाबाबत धोक्याचा इशारा देणे गरजेचे असून न्यायालयाने तसे सरकारला आदेश द्यावेत अशी मागणी करत पुण्यातील यश चिलवार या 24 वर्षीय तरुणाने हायकोर्टात अॅड. पूजा फागणेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने या याचिकेची दखल घेत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला प्रतिवादी करण्याचे आदेश दिले तसेच पेंद्रीय अन्न व औषध प्रशासन विभाग, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.

याचिकेत काय म्हटले आहे

सिगारेट आणि तंबाखूच्या पाकिटांसारख्या ‘धोकादायक उत्पादनांवर’ कॅन्सरची चेतावणी देणारी लेबल असतात त्याप्रमाणे अल्कोहोलच्या बाटल्यांवर धोक्याचा इशारा दिल्यास दारूचे सेवन कमी होण्यास मदत होईल. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अल्कोहोलला गट 1 (सर्वात जास्त धोकादायक) कार्सिनोजेन म्हणून वर्गीकृत केले आहे. अल्कोहोलयुक्त पेये कर्करोगाला आमंत्रण देतात. ही एक गंभीर वस्तुस्थिती आहे. याचा दारूच्या बाटल्यांवरील लेबलिंगवर विशिष्ट आणि ठळक उल्लेख करणे आवश्यक आहे. सध्या अशा लेबलिंगचा अभाव दिसून येतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;