1 लाख कोटींची कंत्राटदारांची बिले थकली, 5 फेब्रुवारीपासून राज्यातील विकासकामे ठप्प पडणार

1 लाख कोटींची कंत्राटदारांची बिले थकली, 5 फेब्रुवारीपासून राज्यातील विकासकामे ठप्प पडणार

येत्या 5 फेब्रुवारीपासून राज्यातील विकासकामे ठप्प पडणार आहेत. कारण मिंधे सरकारच्या काळापासून गेली आठ महिने कंत्राटदारांची सुमारे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची बिले सरकारने थकवली आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनही कंत्राटदारांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे येत्या 5 फेब्रुवारीपासून सर्व कामे बंद करण्याचा इशारा कंत्राटदारांच्या संघटनांनी दिला आहे.

राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत राज्यात पायाभूत सुविधा प्रकल्पांची हजारो छोटी-मोठी कामे सुरू आहेत, परंतु ती कामे करणाऱया कंत्राटदारांची लाखो कोटींची बिले गेल्या आठ महिन्यांपासून सरकारने दिलेली नाहीत. जुलै 2024 पासून ही थकबाकी वाढतच आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जल जीवन मिशन, ग्रामविकास विभाग, जलसंधारण विभाग, नगरविकास विभाग आदी विभागांकडे ही थकबाकी आहे. मंत्रालयाचे हेलपाटे घालून कंत्राटदारांचे बूट झिजले, पण सरकारने केवळ आश्वासने देऊन टाळाटाळ केली, असा कंत्राटदारांचा आरोप आहे.

4 कोटी कामगारांनाही जगण्याची भ्रांत

कंत्राटदार संघटनेशी संलग्न चार लाख कंत्राटदार राज्यात आहेत. त्यांच्या अखत्यारीत सुमारे 4 कोटी कामगार, कर्मचारी आहेत. त्यांच्यासमोरही जगण्याची भ्रांत निर्माण झाली आहे.

– लाडकी बहीणसारख्या योजनांना सरकारने प्राधान्य दिल्यामुळे राज्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा योजना राबवता याव्यात यासाठीच सरकारने पायाभूत सुविधांची कंत्राटदारांची बिले थकवली आहेत. कंत्राटदारांना पैसे मिळाले नाहीत तर ते कामगारांना काय देणार? त्यामुळे कामगारही आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. कंत्राटदारांच्या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी, सरकार प्रसिद्धीसाठी मोफत पैसे वाटण्यावर भर देत आहे, अशी टीका महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केली आहे.

जुलै 2024 पासूनची
थकबाकी कोटीमध्ये
सार्वजनिक बांधकाम 46 हजार
जलजीवन मिशन 18 हजार
ग्रामविकास विभाग 8600 कोटी
जलसंधारण विभाग 19700 कोटी
नगरविकास विभाग 1700 कोटी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;