Manoj Jarange आता मुंबईत धडक, मंत्री समोर आले तर हाणायचं!जरांगेंचे उपोषण स्थगित

Manoj Jarange आता मुंबईत धडक, मंत्री समोर आले तर हाणायचं!जरांगेंचे उपोषण स्थगित

आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण सहाव्या दिवशी सुटले. भाजप आमदार सुरेश धस यांनी सरकार मागण्यांबद्दल सकारात्मक असल्याचे सांगितल्यानंतर जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. यापुढे उपोषण न करता थेट समोरासमोर लढणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. नियोजन करुन आता दोन कोटी मराठे मुंबईत धडक देतील. मुंबई जाम होऊ शकते पण मराठे माघार घेणार नाहीत, असे जरांगे म्हणाले.

मंत्री कोणत्या घरात राहतात, कसे राहतात, कोणत्या कपात चहा घेतात… ते मुंबईत येऊन पाहायचे आहे. यावेळी मुंबईला जाताना अडवले तर मंत्री आणि आमदारांना हाणायचे, असा इशाराही त्यांनी दिला. फडणवीस मराठाद्वेषी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;