सहकार दिंडीचे जल्लोषात स्वागत, सहकाराच्या सक्षमीकरणासाठी राज्य सहकारी बँकेकडून दहा लाखांची मदत

सहकार दिंडीचे जल्लोषात स्वागत, सहकाराच्या सक्षमीकरणासाठी राज्य सहकारी बँकेकडून दहा लाखांची मदत

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने सहकारी पतसंस्थांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीने आयोजित सहकार दिंडीचे स्वागत आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत अत्यंत उत्साहाने करण्यात आले. यावेळी सहकारासंबंधीच्या पुस्तकरुपी दिंडीचे राज्य बँकेत मंत्रोच्चाराने पूजन करण्यात आले.

सहकार दिंडीनिमित्त दिंडीतील सहकारी कार्यकर्त्यांना सहकाराची शपथ देण्यात आली. यावेळी सहकाराच्या सक्षमीकरणासाठी चालू असलेल्या आंदोलनास मदत म्हणून राज्य सहकारी बँकेतर्फे, बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांचे हस्ते पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांना दहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या सहकार दिंडीचा समारोप 8 फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे पतसंस्था फेडरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहकार परिषदेत होणार आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;