थोडक्यात बातम्या – विधी सीईटीच्या परीक्षेत बदल

थोडक्यात बातम्या –  विधी सीईटीच्या परीक्षेत बदल

राष्ट्रीय विधी विद्यापीठांमधील विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱया सामायिक विधी प्रवेश परीक्षेच्या (क्लॅट) धर्तीवर राज्यातील प्रवेश परीक्षा घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून विधी प्रवेश परीक्षेत बदल केला आहे. नव्या बदलानुसार विधी तीन वर्षे आणि विधी पाच वर्षे अभ्यासक्रमांसाठी 150 ऐवजी 120 गुणांची सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा दोन तासांचीच असणार आहे.

अंधेरी येथून 76 लाखांचे एमडी जप्त

एमडी ड्रग तस्करीप्रकरणी एकाला साकीनाका पोलिसांनी अटक केली. मोहम्मद जमाँबदरुज्जन चौहान असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 510 ग्रॅम एमडी जप्त केले. जप्त केलेल्या एमडी ड्रगची किंमत सुमारे 76 लाख रुपये इतकी आहे. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अंधेरी पूर्वच्या साकीनाका परिसरात एक जण ड्रगची विक्री करत असल्याची माहिती साकीनाका पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पोलिसांनी पडताळली. पोलिसांनी बुधवारी रात्री साकीनाका परिसरात सापळा रचून मोहम्मदला ताब्यात घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;