Nitish Kumar Viral Video – महात्मा गांधींना आदरांजली वाहिल्यानंतर नितीश कुमार यांनी वाजवल्या टाळ्या, व्हायरल व्हिडीओवर विरोधक संतापले

Nitish Kumar Viral Video – महात्मा गांधींना आदरांजली वाहिल्यानंतर नितीश कुमार यांनी वाजवल्या टाळ्या, व्हायरल व्हिडीओवर विरोधक संतापले

बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावरून विरोधी पक्षातील नेते त्यांच्यावर टीका करत आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाठणा येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिल्यानंतर अचानक नितीश कुमार टाळ्या वाजू लागले. त्यांना बिहार विधानसभेचे सभापती नंदकिशोर यादव यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. याचाच व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओवरून आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. तेजस्वी यादव म्हणाले आहेत की, ”निती शकुमार हे संघाचे मनापासून भक्त आहेत. त्यांची मानसिक स्थिती राज्य चालवण्यास योग्य नाही, हे या घटनेवरून दिसून येत नाही का? दसऱ्याच्या दिवशी आयोजित रावण दहन कार्यक्रमातही त्यांनी धनुष्यबाण फेकले होते. नंतर काही लोकांनी सांगितले की, त्यावेळी त्याची मानसिक स्थिती अशी होती की, त्यांना वाटले धनुष्य बाणाऐवजी कोणीतरी त्याच्या हातात साप ठेवला आहे, म्हणून त्यांनी ते अचानक फेकून दिलं.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;