वाढलेली दाडी-केस, अंगावर फाटके कपडे; आमिर खान असा रस्त्यावर का फिरतोय? ओळखणेही कठीण

वाढलेली दाडी-केस, अंगावर फाटके कपडे; आमिर खान असा रस्त्यावर का फिरतोय? ओळखणेही कठीण

वाढलेले केस,दाडी, अंगावर फाटके कपडे मुंबईच्या रस्त्यावर आदिमानवासारखा फिरणाऱ्या एका माणसाने सर्वांचेच लक्ष वेधलं. रस्त्यावरील लोकं त्याला थांबून पाहत होते.

पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा कोणी आदिमानव नाही तर तो चक्क आमिर खान आहे. होय, आमिर खानने आदिमानवाचा पेहराव करून तो रस्त्यावर चालत होता. त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. एका पापाराझीने हा पोस्ट केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

वाढलेली दाढी, वाढलेले केस अन् फाटके कपडे 

आमिर खानचा हा अवतार इतका विचित्र होता की रस्त्यावरील कोणही त्याला ओळखू शकलं नाही. तसेच व्हिडीओमध्ये देखील आमिरला ओळखणं कठीण जात आहे. या व्हिडीओमध्ये आमिर रस्त्यावरून जोरजोरात चालताना दिसत आहे.

तसेच हातगाडी ढकलताना दिसत आहे एवढच नाही तर रस्त्यांवून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडे तो एकटक बघत चालताना दिसत आहे. लोकही त्याला मागे वळून हा नक्की कोण माणूस आहे अशा पद्धतीने पाहत आहेत मात्र कोणीही त्याला ओळखलं नाही.


रिअॅलिस्टिक मेकअपमुळे कोणीही ओळखू शकलं नाही

आमिर खान असा वेगवेगळा लूक करून सर्वसामान्य लोकांमध्ये फिरण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने याधीही असे प्रयोग केले आहेत. पण आमिरचा या लूकचा मेकअप इतरा रिअॅलिस्टिक होता की त्याला खरंच कोणीही ओळखू शकत नाही. नेटकऱ्यांनी देखील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनाही हा खरंच आमिर आहे का असा प्रश्न पडला असणार.

आमिरच्या या व्हिडीओचं सिक्रेट अजूनही उलगडलेलं नाही

दरम्यान आमिरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्याचं प्रचंड कौतुक केलं आहे. तसेच हा आगामी चित्रपटासाठी केलेला एक स्टंट आहे का?, कोणती नवी जाहिरात केलीये का? असे अनेक प्रश्न त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी विचारले आहेत. मात्र अद्यापतरी आमिरने कोणतेही उत्तर यावर दिले नाही.आमिर खान लवकरच ‘सीतारे जमीन पर’ या चित्रपटात मात्र पाहायला मिळणार आहे. पण आमिरच्या या व्हिडीओचं सिक्रेट अजूनही उलगडलेलं नाही.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;