Manoj Jarange Patil – ‘आता समोरासमोरची लढाई होणार’, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित

Manoj Jarange Patil – ‘आता समोरासमोरची लढाई होणार’, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज आपलं उपोषण अखेर स्थगित केलं आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून अंतरवाली सराटीत आलेल्या आमदार सुरेश धस यांच्याहस्ते ज्यूस पिऊन त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. मात्र उपोषण स्थगित करताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. ‘मागण्या मान्य करा अन्यथा पुन्हा मुंबई गाठणार’, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. तसेच आता उपोषण नाही, तर समोरासमोरची लढाई होणार, असंही यावेळी ते म्हणाले आहेत.

उपोषण स्थगित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ”हे अंदोलन आपण स्थगित करत आहोत.” ते म्हणाले, आता उपोषण होणारच नाही. आता समोरासमोरची लढाई होणार.” जरांगे म्हणाले, मला 100 टक्के असं वाटत आहे की, देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी बेईमानी आणि गद्दारी करणार नाही. ते मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करतील. त्यांनी हे नाही केलं तर मराठ्यांची बैठक बोलवून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तयारी करणार आहोत.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;