Mahakumbh 2025 – कुंभमेळ्यात जाण्याचा अट्टाहास केला आणि त्यांचाच जीव गेला…पुतण्याने सांगितला महाकुंभमेळ्यातील थरार

Mahakumbh 2025 – कुंभमेळ्यात जाण्याचा अट्टाहास केला आणि त्यांचाच जीव गेला…पुतण्याने सांगितला महाकुंभमेळ्यातील थरार

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी होऊन तब्बल 30 जणांचा मृत्यू झाल्याची घटनेने सर्व देश हादरला आहे. अशातच कुंभमेळ्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एकाच कुटुंबातील 10 जण कुंभमेळ्यात मौनी अमावास्येला स्थानासाठी गेले होते मात्र ज्या काकांनी  कुंभमेळ्याला जाण्याचा अट्टाहास केला त्यांचाच मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील रुपई दिह गावातील एकाच कुटुंबातील दहा जण मौनी अमावास्येला महाकुंभात स्थानासाठी गेले होते. नानकन (47) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नानकन आपली पत्नी रमा देवी आणि कुटुंबातील काही सदस्य रात्री साडेदहाच्या सुमारास संगम नाक्यावर पोहोचले होते. बारा वाजण्याच्या आत तिथून निघून दोन ते तीन वाजेपर्यंत स्टेशनवर पोहोचायचे असे ठरले होते. 11 पर्यंत स्थान आटपले आणि परतणार एवढ्यात आचानक लोकांची गर्दी आमच्या दिशेने आली. लोकांनी आरडाओरड, किंचाळ्या सुरु केल्या. त्यावेळी पोलीस प्रशासन तिथे दिसलेच नाही. त्यावेळी पुढेही जाता येत नव्हते आणि मागेही वळता येत नव्हते अशी परिस्थिती निर्माण झाली होती.त्या गर्दीतून लोकं एकमेकांवर पाय देऊन मार्ग दिसेल तिथून पळत होते. सत्तर ते ऐंशी लोकं तिथे पडले होते. वीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्यातच माझे काका नानकन देखिल होते, असा थरार नानकन यांचा पुतण्या जोखुराम याने सांगितला.

नानकन यांनी पत्नी, भाऊ-वहिनी, पुतणे, जावई यांच्यासह मोठ्या उत्साहात मौनी अमावस्या स्नानाचे नियोजन केले होते. मात्र त्यांनाच जीव गमवावा लागला.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;