हिना दिखावा करत आहे…रोझलिननने पुन्हा एकदा हिना खानवर केली टिका

हिना दिखावा करत आहे…रोझलिननने पुन्हा एकदा हिना खानवर केली टिका

टिव्ही अभिनेत्री हिना खान हिच्या तब्येतीबाबत चाहते ती लवकर बरी होण्याची प्रार्थना करत असताना रोझलीन खानने पुन्हा एकदा हिनाच्या कॅन्सर जर्नीबाबत प्रश्न केले आहेत. रोझलीनला स्वत:ला चौथ्या स्टेजचा कर्करोग असून हिना खान दिखावा करत आहे. तिच्या 15 तासाच्या शस्त्रक्रियेच्या दाव्यावरही तिने खिल्ली उडवली होती आणि ती म्हणाली ती फॅन्सी विग्स का वापरते सेलिब्रिटींनी या सगळ्या गोष्टी सामान्य करायला हव्यात. जेणेकरुन अन्य कर्करोग रुग्णांना बळ मिळेल.

रोझलीनने एएनआयशी बोलताना सांगितले की, हिना किंवा कोणत्याही कर्करोग रुग्णाला मला लक्ष्य करायचे नाही. पण हिना शो ऑफ करत असल्याचे जाणवते. ती विदेशात फिरते पण प्रत्यक्षात कर्करोग रुग्णांना विदेशात फिरण्याची परवानगी नसते. हिनाच्या 15 तासांच्या शस्त्रक्रिया झाल्याचे स्टेटमेण्टही आश्चर्यकारक असल्याचे तिने सांगितले. GNews शी बोलताना रोजलीन म्हणाली, ‘मला चौथ्या स्टेजचा कॅन्सर झाला होता आणि मी देखील त्याच रुग्णालयात उपचार घेत होते. तिने सांगितलेल्या अर्ध्या वेळेत माझी मास्टेक्टॉमी झाली. तिच्या शस्त्रक्रियेला दुप्पट वेळ लागला असा दावा ती कशी करू शकते? मी कर्करोगतज्ज्ञांशीही बोलले आणि मी त्यांना सुद्धा विचारेल की 15 तासांची स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया शक्य आहे का?

हिनाच्या विग घालण्यावरही रोझलिनन टिका केली आहे. मनीषा कोईराला आणि सोनाली बेंद्रे यांचे उदाहरण देत त्यांनी केस कापून लोकांना दाखवले आणि गोष्टी सामान्य करण्याचा प्रयत्न केला. पुढे ती म्हणाली, ‘ती नेहमी फॅन्सी विगच्या मागे का लपते? उलट केसगळती सामान्य असून सेलिब्रिटींची जबाबदारी आहे जेणेकरुन कर्करोग रुग्णांना आदर्श घेता येईल. त्याची लाज वाटणार नाही असे म्हणाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;