Ajit Pawar in Beed – चुकीची कामं झाल्यास मकोका लावणार, बीडमध्ये अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

Ajit Pawar in Beed – चुकीची कामं झाल्यास मकोका लावणार, बीडमध्ये अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) हत्येमुळे बीड (Beed) जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीची सध्या राज्यभरात चर्चा आहे. यातच बीडचं पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे. या बैठकीत बोलताना अजित पवार म्हणाले की, खंडणी सारखे प्रकार केले तर मकोका लावायलाही मागेपुढे पाहणार नाही.

काय म्हणाले अजित पवार?

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, ”आपलं स्वतःच चारित्र्य स्वच्छ ठेवा. आपली प्रतिमा चांगली ठेवा. चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहू देऊ नका. काबाबतही सगळ्यांनी काळजी घ्या.”

‘विकासकामांत खंडणी मागू नका’

अजित पवार म्हणाले की, ”मी आपल्याला सगळ्यांना सांगतोय की, ”विकासाची कामे करत असताना कोणी कोणलाही खंडणी मागण्याचा प्रकार करू नये. माझ्या हे कानावर आल्यानंतर त्यावर मी मकोका लावायलाही मागेपुढे बघणार नाही. मी कुठलीही टोकाची भूमिका घेईन, मीआधीच देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं की, मला येथील पालकमंत्रिपद देत असताना त्या संदर्भात सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;