हे सरकार जनतेचे नाही तर हपापलेल्या राजकारण्यांचे, आदित्य ठाकरे यांनी फटकारले

हे सरकार जनतेचे नाही तर हपापलेल्या राजकारण्यांचे, आदित्य ठाकरे यांनी फटकारले

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून दिल्या जाणाऱ्या अंडी व गोड पदार्थांसाठी लागणाऱ्या साखरेसाठी दिला जाणारा 50 कोटींचा निधी राज्यातील महायुती सरकारने बंद केला आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी नेत्यांच्या साखर कारखान्यांना तब्बल 79 कोटींचा निधी सरकारकडून देण्यात येणार आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला फटकारले आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर दोन बातम्यांची कात्रणं सोशल मीडियावर शेअर करत राज्य सरकारवर टीका केली. ”या दोन बातम्यांवरून राज्यातील भाजप सरकार कशाला प्राधान्य देते ते दिसून येत आहे. 1) राज्य सरकारने नेत्यांच्या साखर कारखाण्याना 79 कोटींचा निधी दिला. 2) राज्य सरकारने शाळांमध्ये मध्यान्ह भोजनात दिली जाणारी अंडी व तांदळाची खीर/नाचणी सत्व यासाठी लागणाऱ्या साखरेचा 50 कोटींचा निधी रद्द केला आहे. मध्यान्ह भोजन हे अनेक विद्यार्थ्यांसाठी पोषक तत्वे मिळणारं एकमेव साधन आहे. पुन्हा एकदा या सरकारने स्पष्ट पणे हे सिद्ध केलं ही हे सरकार फक्त हपापलेल्या राजकारण्याचे आहे. हे सरकार ईव्हीएममुळे निवडून आलेले आहे. हे सरकार सामान्य जनतेचे नाही आणि विशेषत: ज्यांना मतदान करता येत नाही अशा शाळकरी मुलांचे तर अजिबात नाही. मिंधे सरकारमध्ये हिच परिस्थिती गणवेश घोटाळ्याची होती’, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;