महायुती सरकारने चिमुकल्यांच्या तोंडचा घास काढला! माध्यान्ह भोजनातून अंडी, साखर बंद करणार

महायुती सरकारने चिमुकल्यांच्या तोंडचा घास काढला! माध्यान्ह भोजनातून अंडी, साखर बंद करणार

लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महायुती सरकार दिते आहे. पण दुसऱ्या बाजूला चिमुकल्यांच्या तोंडचा घास काढून घेत आहे. महायुती सरकारने माध्यान्ह भोजन योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. माध्यान्ह भोजनात चिमुकल्यांना देण्यात येणारी अंडी आणि गोड पदार्थ वगळण्यात आले आहेत. राज्य सरकारने अंडी आणि गोड पदार्थांसाठी दिला जाणारा निधी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मंगळवारी तसा अध्यादेश जारी केला आहे.

संबंधित शाळा व्यवस्थापन लोकसहभागातून आवश्यक निधी उभारून विद्यार्थ्यांना अंडी, तांदळाची खीर आणि नाचणी सत्व यासारखे पदार्थ देऊ शकतात, असे सरकारने आदेशात नमूद केले आहे. राज्यातील 24 लाख विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडी दिली जात होती. यासाठी वर्षाला राज्य सरकारकडून 50 कोटींचा निधी दिला जात होता.

मुलांमधील प्रथिनांची कमतरता दूर करण्यासाठी दर आठवड्याला एक अंडे देण्याची योजना राज्य सरकारने नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू केली होती. मात्र, काही संघटनांच्या विरोधानंतर सरकारने ही योजना बदलली आहे. आता शाळांना देणग्या गोळ्या करून विद्यार्थ्यांसाठी अंडी आणि गोड पदार्थांची व्यवस्था करावी लागणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींवर राज्य सरकारने 200 कोटींचा खर्च केला. पण आता चिमुकल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेलं पोषक अन्न देण्यास सरकार हात आखडता घेत आहे, अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्ह्यातील शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य शैलेश घरत यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;