करण जोहरने इंडस्ट्रीत नव्या स्टार किडच्या पदार्पणाची घोषणा केली

करण जोहरने इंडस्ट्रीत नव्या स्टार किडच्या पदार्पणाची घोषणा केली

करण जोहरने नव्या स्टार किडच्या पदार्पणाची घोषणा करत एक पोस्ट लिहिली आहे. पतौडी कुटुंबातील छोटा नवाब इब्राहिम खान बॉलिवुडमध्ये पदार्पण करत असल्याच्या चर्चा इंडस्ट्रीत रंगत आहे. तसेच इब्राहिम खान करण जौहर निर्मित ‘सरजमीन’ चित्रपटातून पदार्पण करणार असल्याचे करणने सांगितले आहे. मात्र, या चित्रपटाची अजून करणने अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. मात्र, पुढील चित्रपटात ते इब्राहिम खानलाच लॉन्च करणार असल्याचे सांगितले आहे.

करणने इब्राहिमच्या पदार्पणाची घोषणा करणारी एक पोस्ट लिहिली, जिथे त्याने खान कुटुंबाबद्दल त्याच्या मनात असलेले प्रेम व्यक्त केले. त्याने हे देखील लिहिले की तो या कुटुंबाचा आदर करतो. तसेच करणने सांगितले की सैफच्या कुटुंबाशी त्याचे 40 वर्षांचे नाते आहे, जेव्हा तो फक्त 12 वर्षांचा होता तेव्हा तो पहिल्यांदा अभिनेत्री अमृता सिंगला भेटला होता. आणि अमृता ही सैफची पहिली पत्नी आणि इब्राहिमची आई आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;